Breaking News : ह्रदयद्रावक..! मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा धरणात बूडून मृत्यू

3khadi_2.jpg
3khadi_2.jpg

अहमदपूर (लातूर) : तालुक्यातील अंधोरी येथील दोघे धसवाडी मध्यम प्रकल्पातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोमवारी (ता.२०) रज्जाक रशिद शेख (४५) व मुलगा शाहेद रज्जाक शेख (१२ ) हे बाप-लेक गावापासून दीड किलोमीटर अंतरावर लेंडी नदीवर असलेल्या धसवाडी मध्यम प्रकल्पाच्या नाल्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. नदीवरील बंधा-याच्या पाईपला मासे पकडण्यासाठी जाळी लावून ते दोघे पाईपाजवळ बसले. दरम्यान परिसरात अचानक अर्धा तासात ३८ मिलीमीटर नोंदींचा पाऊस झाला.

या जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अधिक झाला. यावेळी दोघेही वाहत धसवाडी मध्यम प्रकल्पात गेले. वडीलांचा मृतदेह तरंगताना तर मुलाचा मृतदेह दोनशे फुट अंतरावर पुलाच्या चिखलात रूतलेला आढळला. अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळी शवविच्छेदन करुन रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक खुब्बा चव्हाण. पोलिस उपनिरिक्षक गजानन अन्सापूरे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. पोलीस पाटील यलबाजी संभाजी नलवाडे यांनी किनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा  गुन्हा नोंद केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com